शारदा पतसंस्थेत लक्ष्मी पॅनल चे निर्विवाद वर्चस्व
Mahesh Varta March 03, 2020
शारदा पतसंस्थेत लक्ष्मी पॅनलचे निर्विवाद वर्चस्व
संगमनेर – येथील नावलौकीक प्राप्त शारदा नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची निवडणुक नुकतीच संपन्न झाली. त्यामध्ये उद्योजक गिरीश मालपाणी यांच्या नेतृत्वाखालील लक्ष्मी पॅनेलच्या सर्व उमेदवरांनी बाजी मारली असुन, पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध झाले आहे.
सन 2020-2025 या कालावधीसाठी सदर निवडणुक घेण्यात आली. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून गणेश पुरी यांनी कामकाज पाहिले. सदर निवडणुकीत 1 हजार 446 मतदारांनी आपला हक्क बजावला. तर 59 मते अवैध होती.
पतसंस्थेची निवडणुक जाहिर झाल्यानंतर महिला राखीव गटात सौ.सोनाली नावंदर व सौ. रतिका बाहेती, अनुसुचित जाती-जमाती मध्ये सागर वाकचौरे व इतर मागास प्रवर्गात जगदिश टोकसे यांची बिनविरोध निवड झाली. तर उर्वरित जागांसाठी मतदान झाले. त्यात विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे असुन, कंसात त्यांना प्राप्त झालेली मतांची संख्या दिली आहे. सर्वसाधारण गट – गिरीश मालपाणी (1169) , डॉ. योगेश भुतडा (1113), कैलास आसावा (1049), सीए संकेत कलंत्री (1037), सुमित अट्टल (999), राजेश लाहोटी (993), रोहित मणियार (983), राजेश रा.मालपाणी (946), कैलास राठी (943), अमर झंवर (907), विशाल पडतानी (905), उमेश झंवर (878) यांनी बाजी मारली. तर विमुक्त जाती भटक्या जमाती मध्ये 909 मतांनी आघाडी घेत सोमनाथ कानकाटे यांनी विजय संपादन केला.
सर्वसाधारण गटात आशिष जाजू, महेश ओं.नावंदर व आनंद मणियार यांचा तर विमुक्त जाती भटक्या जमाती मध्ये रविंद्र धात्रक यांचा पराभव झाला. मध्यस्थांनी निवडणुक बिनविरोध होण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले परंतु, त्यात यश मिळाले नाही.
200 कोटींच्या ठेवी, जिल्हाभर कार्यविस्तार, एटीएम व रोखीचे मशिन, स्वमालकीची वास्तु, महिला, युवक व ज्येष्ठांसाठी विविध योजना, जलद व तत्पर सेवा, सभासद व कर्मचार्यांसाठी आरोग्यदायिनी योजना, यासह सामाजिक दायित्वावर भर असलेल्या पतसंस्थेत राजकारण नको असाच विचार सभासदांनी केला असावा म्हणूनच लक्ष्मी पॅनेलच्या पारड्यात भरभरून मतांचे दान केले. विजयी उमेदवारांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष फटाक्यांची आतीषबाजी करत साजरा केला. तसेच नवनिर्वाचित संचालकांची मालपाणी विद्यालय ते बालाजी मंदिर अशी मिरवणुक देखील काढण्यात आली.