व्यापार-उद्योगात माहेश्वरी समाजाची आघाडी - सौ.चांडक
Mahesh Varta March 03, 2020
व्यापार-उद्योगात माहेश्वरी समाजाची आघाडी – सौ.चांडक
त्र्यंबकेश्वर – माहेश्वरी समाजाने व्यापार-उद्योगात नेहमीच आघाडी घेतलेली आहे. पारंपारिक व्यवसायात बदल होत असतांना ऑनलाईन आणि जागतिकीकरणाचा लाभ घेऊन महिलांनीही उद्योग-व्यवसायात प्रगती साधावी, संधीचे सोने करावे असे आवाहन विज्डम एक्स्ट्राच्या संस्थापिका सौ.दीपाली चांडक यांनी केले.
नाशिक जिल्हा माहेश्वरी सभा सन 2019-22 ची प्रथम कार्यकारीणी बैठक त्र्यंबकेश्वरला संपन्न झाली. त्यावेळी त्या उपस्थितांना मार्गदर्शन करत होत्या. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश सारडा हे होते. बैठकीस पदाधिकार्यांसह सुमारे 500 समाजबांधव उपस्थित होते. सभेस महिला व युवा यांच्या व्यावसायिक मार्गदर्शनासाठी राष्ट्रीय लघुउद्योग कार्पोरेशनचे वरीष्ठ व्यवस्थापक बी. एल. बरनलाल यांच्यासह प्रदेश सभेचे माजी अध्यक्ष मधुसूदन गांधी उपस्थित होते.
त्र्यंबकेश्वर येथील 75 वयाच्या पुढील ज्येष्ठ नागरीकांचा यावेळी गौरव करण्यात आला. तसेच शिक्षण, क्रीडा, सामाजिक, राजकीय क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविलेल्या जिल्ह्याभरातील समाज बंधू-भगिनींचाही सत्कार करण्यात आला. कार्यालयीन मंत्री चंदन सोनी यांनी नवीन सत्राच्या नवनवीन संकल्पनाची माहिती देत भविष्यातील योजना सांगितल्या.
श्री.गांधी यांनी अखिल भारतवर्षीय माहेश्वरी सभेच्या विविध योजनांची माहिती दिली. तर बरनवाल यांनी लघुउद्योगासंबंधीत माहिती देत शंकाचे निरसन केले. सौ.चांडक यांनी महिलांसाठी विविध योजना, व्यावसायिक संधी, भविष्यातील व्यापाराचा बदलता प्रकार आदी बाबत मार्गदर्शन केले.
युवक मंडळातर्फे समाजाच्या बिझनेस फोरमच्या ऑनलाईन डिरेक्टरीची माहिती राहुल बजाज यांनी दिली. सदरहू कार्यक्रमास माजी अध्यक्ष उमेशजी मुंदडा , माजी सचिव संतोषजी जाजु, मानद मंत्री दिनेशजी मुंदडा, संघटक शांतीलालजी लढ्ढा, कोषाध्यक्ष सुरेशजी नावंदर , उपाध्यक्ष मनोज राठी, जयप्रकाश लाहोटी, रामेश्वर सारडा, प्रकाशजी कलंत्री, सह सचिव मनोज भुतडा, पन्नालालजी भांगडिया सूनीलजी डागा, विजयजी सोमाणी, नाशिक जिल्हा महिला संघटन अध्यक्ष सौ. निताजी डागा, युवा संघटन अध्यक्ष राहुलजी लोया, अखिल भारतीय माहेश्वरी सभेचे उपाध्यक्ष श्री अशोकजी बंग, महाराष्ट्र प्रदेश कोषाध्यक्ष दिनेशजी सोमाणी, राजारामजी भांगडिया, प्रदीपजी बूब, सुरेशजी केला, जयप्रकाशजी जातेगावकर तसेच निफाड, सायखेडा ,येवला, मालेगाव ,नांदगाव, सटाणा, इगतपुरी पिंपळगाव, ओझर, लासलगाव, सिन्नर वावी ,भगूर नासिकरोड,सिडको, नासिक व इतर विभाग अध्यक्ष, सचिव व समाज बंधु, त्र्यंबकेश्वर माहेश्वरी सभेचे अध्यक्ष दीपक लढ्ढा आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन संतोषजी जाजू, पंकजजी भुतडा व सौ. रुपालीजी भुतडा यांनी केले. शांतीलालजी लढ्ढा यांनी त्रंबकेश्वर माहेश्वरी नगर सभेचे व इतर सर्वांचे आभार मानले.