सौ. किरण झंवर अहमदनगर जिल्हा सभेच्या वतीने सन्मानित
Mahesh Varta March 08, 2020
लोणीची कन्या, संगमनेर ची स्नुषा
सौ. किरण झंवर अहमदनगर जिल्हा सभेच्या वतीने सन्मानित
संगमनेर – येथील सौ. किरण महेश झंवर यांचा आज महिला दिनाचे औचित्य साधून अहमदनगर जिल्हा सभेच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.
सौ. झंवर यांना संगमनेर नगर परिषदेच्या वतीने “स्त्री शक्ती पुरस्कार 2020” ने सन्मानित केले, यानिमित्ताने महिला दिनाचे दिवशी त्यांचा सन्मान करण्यात आला.
सौ. झंवर यांच्या घरात स्वतःचे 2 हजार पुस्तकांचे भव्य वाचनालय, महिला, युवक-युवतीच्या आनंदी सहली व गिर्यारोहणासाठी विशेष सहलींचे आयोजन, गो-ग्रीन या सामाजिक संस्थेची स्थापना, घराच्या टेरेसवर व परसबागेत कचऱ्याच्या फुलवलेला बगीचा, त्यातून अनेक महिलांना मार्गदर्शन, संगमनेर शहरातील मंदिरे तसेच गणेश विसर्जनाच्या दिवशी निर्माल्य संकलन करून त्यापासून खत निर्मिती करणे, तसेच सायकलिंग चा छंद म्हणून यापूर्वी गोवा व नुकतेच नैनिताल येथे 6 दिवस डोंगर दऱ्यातून सायकलिंग अशा विविध सामाजिक क्षेत्रात त्या कार्यरत असतात.
सौ. झंवर यांचा या कार्याबद्दल व यासाठी सतत प्रेरणा देणारे महेश झंवर या द्वयीचा पुष्पगुच्छ, मानपत्र व शाल देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी प्रदेश जनसंपर्क मंत्री मनिष मणियार, जिल्हाध्यक्ष अनिष मणियार, जिल्हा मंत्री अजय जाजू, जिल्हा संयुक्त मंत्री सतीश बाहेती, तालुका संगठण मंत्री संजय रा. मालपाणी उपस्थित होते.
श्री व सौ झंवर यांना सायकलिंग प्रमाणेच माऊंटनिग ची देखील फार आवड आहे. यासाठी ते स्वतः तर जातातच. त्याचबरोबर आपल्या पाल्यांमध्ये देखील माऊंटनिग ची आवड निर्माण केली.
सौ. झंवर यांना देण्यात आलेल्या मानपत्राचे वाचन सतीश बाहेती यांनी केले. मनिष मणियार व अनिष मणियार यांनी झंवर दाम्पत्याच्या कार्याचा गौरव केला. तर सौ. झंवर यांनी नैनिताल येथील 6 दिवसाच्या सायकलिंग माहिती दिली. सर्व मान्यवरांनी पुनश्च पुरस्काराच्या शुभेच्छा दिल्या. जिल्हा मंत्री अजय जाजू यांनी आभार मानले.